स्थान - T:सिल्लोड D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वसती
सिल्लोड
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सिल्लोड हे गाव, संभाजीनगर-जळगाव मार्गावर संभाजीनगरहून ईशान्येस ६१ कि.मी. आहे व अजिंठ्याहून किंचित नैऋत्येस २९ कि.मी. आहे. सिल्लोड येथे महानुभाव आश्रम आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सिल्लोड शहराच्या पश्चिम विभागी संत गाडगेबाबा चौकाजवळ बामेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर फरशी बसविलेली आहे. देवळापुढे प्राचीन बारव आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भोकरदनहून सिल्लोडला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. ४२७, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आन्व्याला गेले.