मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

चारनेर · सिल्लोड · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:सिल्लोड D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वसती चारनेर

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चारनेर हे गाव, सिल्लोड घाट नांद्रा मार्गावर सिल्लोडहून वायव्येस २७ कि.मी. आहे व घाटनांद्राहून आग्नेयेस ४ कि.मी. आहे. चारनेरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चारनेर गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: सिल्लोड | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात आन्व्याहून चारनेरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. २२० तू.प्र.स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून करंजखेडला गेले. देवळाबाहेरील दरवाज्याच्या दक्षिण बाजूचे स्थान व गावापासून पश्चिमेस अंदाजे २०१ मीटर अंतरावरील महादेवाच्या देवाळाजवळचे स्थान हे दोन्ही स्थाने निर्देशरहित आहेत .

जवळील इतर स्थाने