मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बार्शीटाकळी · बार्शीटाकळी · अकोला

स्थान - T:बार्शीटाकळी D:अकोला

स्थान क्र. 1 वसती बार्शीटाकळी

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बार्शीटाकळी हे गाव, अकोला-मंगरूळपीर मार्गावर अकोल्याहून आग्नेयेस १६ कि.मी. आहे व मंगरूळपीरहून वायव्येस ४८ कि.मी. आहे. पातूर ते बार्शीटाकळी, मार्गे कापशी २४ कि.मी. आहे. पातूर ते बार्शीटाकळी पायमार्गे (राजदा मार्गे) २० कि.मी. आहे. बार्शीटाकळी हे पूर्णा-खांडवा लोहमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बार्शीटाकळी गावातील माळीपुरा विभागात विदुपा नदीच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे उत्तरेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: बार्शीटाकळी | Distt: अकोला
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना पातूरहून बार्शीटाकळीला आले. त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. १४८, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून येळवणला गेले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातील स्थान निर्देशरहित आहे .

जवळील इतर स्थाने