मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

माना · मूर्तिजापूर · अकोला

स्थान - T:मूर्तिजापूर D:अकोला

स्थान क्र. 1 वसती माना

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
माना हे गाव, अकोला-अमरावती मार्गावरील माना फाट्यापासून उत्तरेस २ कि.मी. आहे. १) अमरावती ते माना फाटा ४२ कि.मी. २) मूर्तिजापूर ते माना फाटा १४ कि.मी. येळवणहून बोरगावमंजू, मूर्तिजापूर मार्गे तथा कानशिवणी रंभापूर मूर्तिजापूर मार्गे मान्याला जाता येते. मान्याला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. भुसावळ-नागपूर लोहमार्गावरील मूर्तिजापूर व बडनेरामधील माना हे रेल्वेस्थानक आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान माना गावाच्या दक्षिणेस अंदाजे ८०४ मीटर अंतरावर उमा नदीच्या मध्यपात्रात पूर्वाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण 'माणिकेश्वर' या नावाने ओळखले जाते.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: मूर्तिजापूर | Distt: अकोला
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नायगावहून मान्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. १७३, पू. ली. १५९ ख. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून मंगरूळला गेले.

जवळील इतर स्थाने