स्थान - T:मूर्तिजापूर D:अकोला
स्थान क्र. 1
वसती
लाखपुरी
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लाखपुरी हे गाव, मूर्तिजापूर-दर्यापूर मार्गावर मूर्तिजापूरहून उत्तरेस १२ कि.मी. आहे व दर्यापूरहून दक्षिणेस १२ कि.मी. आहे. अकोला ते लाखपुरी (बोरगाव मंजु, कोलखेड बहादूरपूर, जांभा मार्गे) ४२ कि.मी. आहे. लाखपुरी येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. यतमाळ-अचलपूर लोहमार्गावरील मूर्तिजापूर व दर्यापूरमधील लाखपुरी हे रेल्वेस्थानक आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान लाखपुरी गावाच्या वायव्य विभागी लक्षणेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर शाहाबादी फरशी बसविलेली आहे. आज हे देऊळ 'लक्षेश्वर' या नावाने प्रचलित आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना येळवणहून लाखपुरीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. १५०, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून शिंगणापूरला गेले.