स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
लाडजळगाव
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लाडजळगाव, शेवगाव-गेवराई मार्गावरील बोधेगावापासून दक्षिणेस ५ कि.मी. आहे. शेवगाव ते बोधेगाव २५ कि.मी. गेवराई ते बोधेगाव ३९ कि.मी. शेवगावहून लाडजळगाव (मंगरूळ, हसनापूर, आंतरवाली मार्गे) २९ कि.मी. आहे. चकलांब्याहून पश्चिमेस लाडजळगाव पायमार्गे ६ कि.मी. आहे. चकलांब्याहून लाडजळगावला जीपचा रस्ता आहे. लाडजळगावला जाण्यासाठी शेवगावहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान लाडजळगावच्या वायव्य विभागी सरकारी दवाखान्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. आज हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने ओळखले जाते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात चापडगावहून लाडजळगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून नागलवाडीला गेले.