मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नागलवाडी · शेवगाव · अहिल्यानगर

स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 आसन नागलवाडी

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लाडजळगावहून दक्षिणेस नागलवाडी (गोळेगाव मार्गे) ६ कि.मी. आहे. नागलवाडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नागलवाडीच्या ईशान्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर डोंगराच्या दऱ्यात नागार्जुनाच्या उत्तराभिमुख भुयाराच्या तोंडी आहे. स्थानाचा ओटा नाही. जागा निश्चित आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: शेवगाव | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना या भुयाराच्या तोंडी लोंबता श्रीचरणी आसन होते. तेव्हा सर्वज्ञ दायंबाला म्हणाले, 'या भुयारात नागार्जुन पडलेला आहे. त्याचे धड आणि शिर वेगळे पडले आहे. जो कोणी ते लावेल, त्याला सिद्धी प्राप्त होईल. तुम्ही जाऊन लावले, तर तुम्हालाही सिद्धी प्राप्त होईल.' दायंबा म्हणाले, 'जी जी आपण आम्हाला कुठे दर्शन द्याल?' सर्वज्ञ म्हणाले, 'ते सांगता येणार नाही.' दायंबा म्हणाले, 'तर मग तसाच पडून राहू द्या.' (उ. ली. ५५३, स्था. पो.) सन १९९१ मध्ये विवराच्या समोरील जागेत एक स्थान बांधण्यात आले आहे. ते स्थान पोथीप्रमाणे 'मादने स्थान' घडू शकते.

जवळील इतर स्थाने