स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 2
जळक्रीडा
नागलवाडी
जळमांडवी, जळक्रीडा स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लाडजळगावहून दक्षिणेस नागलवाडी (गोळेगाव मार्गे) ६ कि.मी. आहे. नागलवाडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नागलवाडीच्या वायव्येस एक कि.मी. अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात केदारेश्वराचे पूर्वाभिमुख देऊळ आहे. त्या देवळाच्या पाठीमागे जळमांडवी म्हणजे विहीर आहे. विहिरीचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. तेच जळक्रीडा स्थान होय. विहीर नमस्कारी आहे. बाहेर उभे राहूनच नमस्कार करावा.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथे जळक्रीडा केली. (स्था. पो.) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात लाडजळगावहून नागलवाडीला आले.नागार्जुनाची खांडदेवळी पश्चिमाभिमुख होती. नासीच्या पटीशाळेवर त्यांचे २० दिवस वास्तव्य होते. खांडदेवळी, पटीशाळा पडल्यामुळे अवस्थान स्थान बुजून गेले आहे. ते आज उपलब्ध नाही. त्या जागेचे उत्खनन केल्यास स्थान उपलब्ध होऊ शकेल. २० दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून चकलांब्याला गेले.