स्थान - T:पाथर्डी D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
खरवंडी कासार
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
खरवंडी हे गाव, पाथर्डी-पाडळशिंगी मार्गावर पाथर्डीहून पूर्वेस २५ कि.मी. आहे व पाडळशिंगीहून पश्चिमेस ४१ कि.मी. आहे. पारगावहून नैऋत्येस खरवंडी पायमार्गे (भारजवाडी मार्गे) ६ कि.मी. आहे. खरवंडीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खरवंडी गावाच्या पश्चिम विभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात घोगसपारगावहून खरवंडीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. ५७४, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून येळीला गेले.