स्थान - T:शेवगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
आव्हाणे बु
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आव्हाणे बु. हे गाव, पाथर्डी-शेवगाव मार्गावरील अमरापूर गावापासून पश्चिमेस ५ कि.मी. आहे. त्याचप्रमाणे शेवगाव-पांढरीचा पूल या मार्गावरील मळेगावापासून दक्षिणेस व ढोरजळगावापासून पूर्वेस ५ कि.मी. आहे. पाथर्डी ते अमरापूर १० कि.मी. शेवगाव ते ढोरजळगाव १५ कि.मी. पांढरीचा पूल ते ढोरजळगाव २८ कि.मी. आव्हाणे बु. हे गाव येळीहून वायव्येस निपाणी जळगाव, पागोरी पिंपळगाव, अमरापूर मार्गे २३ कि.मी. आहे. हा मार्ग पायी जाण्यासाठी व जीपसाठी आहे. येळी ते आव्हाणे बु. (पाथर्डी मार्गे) ३५ कि.मी. आहे. आव्हाणे बु. येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. आव्हाणे येथे पुजारी गृही काष्टाचा नमस्कारी महाल आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आव्हाणे गावाच्या दक्षिणेस गावालगतच नदीच्या उत्तर काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात दोन वेळा आव्हाणे येथे आले. पहिल्या वेळेस ते वांबोरीहून आले व दुसऱ्या वेळेस येळीहून आले. दोन्हीही वेळेस त्यांचे या ठिकाणी एक एक रात्र वास्तव्य होते. पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून देवळाण्याला गेले व दुसऱ्या वेळच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून भोकरला गेले. ( उ . ली .२९२ , स्था . पो . उ . ली .४४८ ख प्र . )