स्थान - T:पाथर्डी D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
आसन
खांडगाव (लोहसर)
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
खांडगाव, पांढरीचा पूल ते करंजी मार्गावर पांढरीच्या पुलाहून १७ कि.मी. आहे व करंजीहून वायव्येस ६ कि.मी. आहे. (करंजी हे गाव, नगर-पाथर्डी मार्गावर आहे व पांढरीचा पूल नगर-संभाजीनगर मार्गावर आहे) मिरीहून दक्षिणेस खांडगाव पायमार्गे (कडगाव, राघोहिवरा मार्गे) ११ कि.मी. आहे. खांडगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खांडगावच्या उत्तरेस अंदाजे १०१ मीटर अंतरावर ओढाच्या उत्तर काठी श्री. वाळेकर यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात मिरीहून खांडगावला आले. त्यांना येथे आसन झाले. साधाने कणेराची फुले वेचून आणली. सर्वज्ञांची पूजा केली. मग सर्वज्ञांनी आरोगणा केली. साधाला पुढे केळीपिंपळगावला पाठविले. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सर्वज्ञ येथून केळीपिंपळगावला गेले. (उ. ली. २११ तू. प्र. स्था., पो.)