स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
अवस्थान स्थान (आदित्य देवळ)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलापूर हे गाव, श्रीरामपूर-अहिल्यानगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून १२ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते बेलापूर ६० कि.मी. सोनई ते बेलापूर ४३ कि.मी. बेलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर बु. हे गाव, दौंड-मनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. बेलापूर व श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बेलापूर गावाच्या नैऋत्येस श्रीरामपूरअहिल्यानगर मार्गाच्या पूर्व बाजूस प्रवरा नदीच्या उत्तर काठावर पुलाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. देवळाच्या पूर्वपश्चिम बाजूसही एकएक दरवाजा आहे. देवळाच्या आवाराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून पूर्व बाजूलाही एक प्रवेशद्वार आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. आज हे देऊळ 'श्रीदत्त मंदिर' या नावाने ओळखले जाते.