मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलापूर बु · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 3 तूप वाढणे बेलापूर बु

माहादाइसा तूप वाढणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलापूर हे गाव, श्रीरामपूर-अहिल्यानगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून १२ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते बेलापूर ६० कि.मी. सोनई ते बेलापूर ४३ कि.मी. बेलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर बु. हे गाव, दौंड-मनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. बेलापूर व श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आरोगणा स्थानाच्या उत्तरेस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
माहादाइसा भिक्षा मागून आल्यावर भोजन करीत होत्या. तेव्हा सर्वज्ञ हातामध्ये तुपाची बुधली घेऊन माहादाइसाला तूप वाढण्यासाठी आले. माहादाइसा सर्वज्ञांना म्हणाली, 'आपणच सांगितले की, तूप मिळाले असतानाही सेवन करू नये.' सर्वज्ञ म्हणाले, 'तुम्ही आपल्या इच्छेने कोणताही पदार्थ सेवन करू नका; परंतु आम्ही दिला असता तुम्हाला सेवन करण्यास हरकत नाही.' मग माहादाइसाने तूप घेतले. (उ. ली. ६०४, स्था. पो.) महादाईसा तूप वाढणे स्थानाच्या उत्तर बाजूस एक स्थान आहे . गोपाळ बासांच्या मते सर्वज्ञांनी येथे वज्री घडली . आरोगणा स्थानाच्या पूर्व बाजूस देवपूजेचे आसन आहे .

जवळील इतर स्थाने