मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलापूर बु · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 7 वज्री बेलापूर बु

वज्री घडणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलापूर हे गाव, श्रीरामपूर-अहिल्यानगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून १२ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते बेलापूर ६० कि.मी. सोनई ते बेलापूर ४३ कि.मी. बेलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर बु. हे गाव, दौंड-मनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. बेलापूर व श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तर सोंडी आसन स्थानाच्या उत्तरेस आहे. वज्रीच्या स्थानाची जागा म्हणजे प्राचीनकाळीच्या आदित्याच्या देवळाच्या अंगणाचा वायव्य कोन होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना या ठिकाणी उत्तराभिमुख गरुडासन होते. त्यांनी अंगी परिधान केलेली होती, अंगीचे कसे मोकळेच होते. श्रीमुगुटी टोपरे, त्याचेही कसे मोकळेच. उपरण्याचे दोन्हीही पदर श्रीमुगुटावर सोडलेले होते. त्यांनी अंगीच्या बाह्या वरती करून डाव्या श्रीकरी काळी वीट घेऊन उजव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने खाली दाबून धरली आणि उजव्या श्रीकरी चिपतळ घेऊन वज्री घडली. पुन्हा दोन्ही श्रीकरांनी वस्त्र दगडी चिऱ्यावर घासून सारखी केली. अंगीच्या बाह्या पुन्हा वरती करून वज्री दृष्टीने अवलोकन केली आणि पुन्हा घडली. माहादाइसा ही लीळा पाहात होत्या. त्यांनी श्रीनागदेवाचार्यानाही ही लीळा पाहण्यासाठी बोलाविले. माहादाइसांनी सर्वज्ञांना विचारले, 'हे आपण काय करीत आहात?' सर्वज्ञ म्हणाले, 'आम्ही वज्री घडत आहेत.' 'जी जी वज्री म्हणजे काय?' माहादाइसांनी विचारले. सर्वज्ञ म्हणाले, 'वज्री म्हणजे वारितुंग' 'जी जी वारितुंग म्हणजे काय?' पुन्हा माहादाइसांनी विचारले. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, 'वारितुंग म्हणजे एक प्रकारचे घोडे. ते बेटांमध्ये असतात. ते पाण्यावर चालतात. तशी ही वज्री. ही पण पाण्यावर तरंगते, म्हणून यालाही वारितुंग असे म्हटले जाते.' ही लीळा माहादाइसा देहांतपर्यंत आठवित होत्या. ही लीळा आठवितच त्यांनी नवगावी देहत्याग केला. (उ. ली. ६३२, स्था.पो.)

जवळील इतर स्थाने