स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
परिश्रय स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलापूर हे गाव, श्रीरामपूर-अहिल्यानगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून १२ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते बेलापूर ६० कि.मी. सोनई ते बेलापूर ४३ कि.मी. बेलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर बु. हे गाव, दौंड-मनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. बेलापूर व श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मुख्य देवळाच्या पश्चिम बाजूस उत्तराभिमुख लहानशा देवळात आहे. मुख्य देवळाच्या पश्चिम दरवाजातून बाहेर पडल्यावर समोरच लहानसे देऊळ आहे.मुख्य देवळाच्या वायव्येस , आवाराच्या वायव्य विभागी पूर्वाभिमुख देवळात श्री दत्तात्रय प्रभूंचे मांडलिक स्थान आहे . मुख्य देवळाच्या समोरील बाजूस एक मंदिर आहे . या मंदिराला दक्षिणाभिमुख व उत्तराभिमुख असे दोन दरवाजे आहेत या मंदिरात एकूण तीन स्थाने आहेत .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.