मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

बेलापूर बु · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 11 आसन बेलापूर बु

आसन स्थान (समोरच्या मंदिरात - आग्नेय)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलापूर हे गाव, श्रीरामपूर-अहिल्यानगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून १२ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते बेलापूर ६० कि.मी. सोनई ते बेलापूर ४३ कि.मी. बेलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर बु. हे गाव, दौंड-मनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. बेलापूर व श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मंदिराच्या आग्नेय विभागी दक्षिणाभिमुख दरवाजातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंबाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना येथे लिंबाच्या झाडाला टेकून पूर्वाभिमुख आसन होत असे. (स्था. पो. उ. प्र.) येथील इतर लीळा : १) सर्वज्ञांना येथे आसन असताना माहादाइसांची व दायंबाची भेट झाली. त्याप्रसंगी सर्वज्ञांनी माहादाइसाला दुर्भगेचा दृष्टांत निरूपण केला. (उ. ली. ५९९) त्यानंतर माहादाइसांनी सर्वज्ञांना ज्ञानांकुशाची गोष्ट सांगितली. (उ. ली. ६००) २) म्हाईभटांना द्रव्य घेऊन येण्यासाठी अनुज्ञा देणे. (स्था. पो. उ. प्र.) ३) भटोबासांची वास पाहणे. (उ. ली. ६०३) ४) माहादाइसाला सर्वतोमुख विखो निरूपणे ५) माहादाइसा याच ठिकाणी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंना अनुसरल्या. (उ. ली. ६३१)

जवळील इतर स्थाने