स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 18
अवस्थान
बेलापूर बु
अवस्थान स्थान (वनदेव)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलापूर हे गाव, श्रीरामपूर-अहिल्यानगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस ६ कि.मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून १२ कि.मी. आहे. अहिल्यानगर ते बेलापूर ६० कि.मी. सोनई ते बेलापूर ४३ कि.मी. बेलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर बु. हे गाव, दौंड-मनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस ६ कि.मी. आहे. बेलापूर व श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बेलापूर बु. गावाच्या दक्षिणेस एक कि.मी. अंतरावर सातभाई वसाहतीत, चांदेगाव , ब्राह्मणगाव रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात बेलापूरहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी दहा दिवस वास्तव्य होते. (उ.ली. ५८१ स्था. पो.)