स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
आसन
चास (नळी)
चासी, आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चास (नळी) हे गाव, विंचूर-सावळे विहीर मार्गावर विंचूरहून २४ कि.मी. आहे व कोळपेवाडीहून १० कि.मी. आहे. कानळसहून चास (कानळस फाटा मार्ग) ६ कि.मी. आहे. कानळसहून पूर्वेस चास बक्तरपूरमार्ग ४ कि.मी. आहे. चासला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चास गावाच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या पात्रात पुलाच्या पश्चिमेस चासाच्या दक्षिण काठावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कानळसहून चासला आले. त्यांना प्रथम चासापाशी थोडा वेळ आसन झाले. मग त्यांनी चासाचे अवलोकन केले. डखले नावाच्या भक्ताने सर्वज्ञांना विचारले. "जी जी हे चास येथे कसे काय निर्माण झाले?" तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, "हे बळिभद्राचे चास, येथे गंगा कोरडी होती, म्हणून त्याने येथे नांगर घातला. तेव्हापासून गंगा वाहू लागली." (पू. ली. २७७, ख. प्र. स्था. पो.)