स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
सुरेगाव (सांगवी)
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सुरेगाव, कोळपेवाडी साखर कारखान्यापासून उत्तरेस ३ कि.मी. आहे. कोळपेवाडी, विंचूर-सावळे विहीर मार्गावर आहे. कोपरगावहून धारणगावमार्गे कोळपेवाडीस जाण्यास मार्ग आहे. चासहून सुरेगाव (कोळपेवाडी मार्गे) १३ कि.मी. आहे व पायमार्गे ८ कि.मी. आहे. कोळपेवाडीपर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. सुरेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सुरेगावच्या ईशान्येस गावालगतच गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात चासहून सुरेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. २७४, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सोनारीला गेले. वसती स्थानापुढील दोन स्थाने निर्देशरहित आहेत .