स्थान - T:कोपरगाव D:अहिल्यानगर
स्थान क्र. 3
आसन
कोकमठाण
आसन स्थान (चौक)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
कोपरगावहून आग्नेयेस कोकमठाण ४ कि.मी. आहे. पुणतांबा-कोपरगाव मार्गावरील कोकमठाण फाट्यापासून 'कोकमठाण' ३ कि.मी. आहे. संवत्सरहून दक्षिणेस कोकमठाण सव्वा कि.मी. आहे. कोकमठाणला जाण्यासाठी कोपरगावहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दामोदराच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर शहाबादी फरशी बसविलेली आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सिंगेश्वराहून कोकमठाणला आल्यावर त्यांना प्रथम देवळाच्या चौकात थोडा वेळ आसन झाले. मग सर्वज्ञ माडापाशी गेले. एकाग्र दृष्टीने अवलोकन करून माडाच्या चारी कळसांना स्पर्श केला. त्यानंतर पुन्हा येथेच आसन झाले. (पू.ली. २३०, क. प्र., स्था.पो.उ.प्र.)