मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

पुणतांबा · राहाता · अहिल्यानगर

स्थान - T:राहाता D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती/अवस्थान पुणतांबा

वस्ती स्थान आणि अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पुणतांबा हे गाव, कोपरगावहून आग्नेयेस २३ कि.मी. आहे, व श्रीरामपूरहून उत्तरेस १८ कि.मी. आहे. कोकमठाणहून आग्नेयेस पुणतांबा पायमार्गे १५ कि.मी. आहे. दौंड-मनमाड लोहमार्गावरील श्रीरामपूर-कोपरगाव मधील पुणतांबा हे रेल्वे स्थानक आहे. तसेच पुणतांबा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे व रेल्वे स्थानकाजवळ महानुभाव आश्रमही आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पुणतांबा रेल्वेस्थानकापासून उत्तरेस १ कि.मी. अंतरावर, चांगदेव मंदिराच्या उत्तरेस व रेल्वे पुलाच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर दक्षिणाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाताळ गुंफा होती. ही प्राचीन व प्रेक्षणीय गुंफा आजतागायत सुरक्षित अवस्थेत होती. परंतु सन २००७ मध्ये झालेल्या स्थान जीर्णोद्धारामुळे या गुंफेचे अस्तित्व नष्ट झाले.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: राहाता | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पहिल्या वेळेस कोकमठाणहून पुणतांब्याला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पूर्वार्ध लीळा २८३ ख. प्रत, स्थान पोथी) व दुसऱ्या वेळेस नाऊरहून पुणतांब्याला आले. त्या वेळी त्यांचे येथे वीस दिवस वास्तव्य होते. सकाळचा, दुपारचा व सायंकाळचा असे तीन्हीही पूजावसर येथे होत असत. (पूर्वार्ध लीळा २८६ ख. प्रत, स्थान पोथी)

जवळील इतर स्थाने