स्थान - T:पारनेर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
अवस्थान स्थान
पारनेर
अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पारनेर हे गाव, अहिल्यानगरहून नैऋत्येस (भाळवणी, जामगाव मार्ग) ३८ कि.मी. आहे व सुपा मार्गानेही ३८ कि.मी. आहे. भाळवणी हे गाव, नगर-कल्याण मार्गावर आहे व सुपा हे गाव, नगर-पुणे मार्गावर आहे. पारनेरला जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
पारनेर गावाच्या पश्चिमेस ३ कि.मी. अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात सिद्धेश्वराच्या (सोमनाथाच्या) पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे. देवळाला एकूण तीन दरवाजे आहेत एक दक्षिणाभिमुख, एक उत्तराभिमुख व एक पश्चिमाभिमुख. उत्तराभिमुख दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या हाताचा जो चौक, तो नमस्कारी आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात नेप्तीहून पारनेरला आले. त्यांचे या ठिकाणी सात दिवस वास्तव्य होते. (उ. ली. २८५, स्था. पो.) त्यानंतर ते येथून लोणीला गेले.
स्थान Aarati
- सकाळची आरती — 20:50 ते 20:51
- सकाळची आरती — 20:50 ते 20:51