स्थान - T:पारनेर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 2
पारनेर
पूजा, आरोगणा स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पारनेर हे गाव, अहिल्यानगरहून नैऋत्येस (भाळवणी, जामगाव मार्ग) ३८ कि.मी. आहे व सुपा मार्गानेही ३८ कि.मी. आहे. भाळवणी हे गाव, नगर-कल्याण मार्गावर आहे व सुपा हे गाव, नगर-पुणे मार्गावर आहे. पारनेरला जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
सिद्धेश्वराच्या देवळात उत्तराभिमुख दरवाजातून बाहेर पडणे. देवळाच्या पाठीमागील १८ पायऱ्या उतरून खाली जाणे. खाली गेल्यावर तेथे पारेश्वराचे (महादेवाचे) पूर्वाभिमुख लहान देऊळ आहे. या देवळाच्या चौकात हे स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. (उ. ली. २८५, स्था. पो.)
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे दुपारी पूजावसर होत असे आणि दुपारचे भोजनही याच ठिकाणी होत असे (उ. ली. २८६ , स्था. पो.उ. प्रत )