स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
आसन
पुरणगाव
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
पुरणगाव, पुणतांबा-वैजापूर मार्गावर पुणतांब्याहून ईशान्येस ४ कि.मी. आहे व वैजापूरहून किंचित नैऋत्येस १८ कि.मी. आहे. पुरणगावला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पुरणगावच्या दक्षिण विभागी उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात धोत्र्याहून पुरणगावला आले. त्यांना येथे आसन झाले. (पू. ली. २९१ ख. प्र., स्था. पो. उ. प्र.) गावातील मठात त्यांचा एक रात्र मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी ते येथून सावखेडला गेले.