स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर
स्थान क्र. 1
वस्ती
हिंगोणी
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
हिंगोणी हे गाव, पुणतांबा-वैजापूर मार्गावर पुरणगावहून उत्तरेस ५ कि.मी. आहे व वैजापूरहून किंचित नैऋत्येस १३ कि.मी. आहे. हिंगोणीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान हिंगोणी गावाच्या पूर्वेस वैजापूर सडकेच्या पूर्व बाजूस आग्नेयाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पुणतांब्याहून हिंगोणीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. २८३, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून धोत्र्याला गेले.