स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
आसन
नायगाव
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
श्रीरामपूर-नाऊर मार्गावरील नायगाव फाट्याहून नायगावला जाता येते. नायगावफाटा ते जुने नायगाव ५ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते नायगावफाटा १७ कि.मी. आहे व नाऊर ते नायगावफाटा ३ कि.मी. आहे. पुणतांबा ते जुने नायगाव ७ कि.मी. आहे. हिंगोणीहून आग्नेयेस नायगाव (ढोक नांदूर, हिरडे वस्ती मार्गे) ८ कि.मी. आहे. नायगाव व नायगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नायगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानापासून काही अंतरावर महानुभाव आश्रम आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जुन्या नायगावच्या नैऋत्येस अंदाजे २०१ मीटर अंतरावर पुणतांबा रस्त्याच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पुणतांब्याहून नायगावला आले. त्यांना येथे थोडा वेळ आसन झाले. तेवढ्यात दायंबा आले. सर्वज्ञांची व दायंबांची भेट झाली. (पू. ली. २८४ ख. प्र., स्था. पो.) त्यानंतर ते तेथून नाऊरला गेले.