स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती
नाऊर
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नाऊर हे गाव, श्रीरामपूर-वैजापूर मार्गावर श्रीरामपूरहून उत्तरेस २० कि.मी. आहे व वैजापूरहून दक्षिणेस २१ कि.मी. आहे. नायगावहून पूर्वेस नाऊर पायमार्गे ३ कि.मी. आहे. नाऊरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. नाऊर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नाऊर गावाच्या नैऋत्येस अंदाजे १०१ मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठी पुलाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नायगावहून नाऊरला आले. येथे दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली व रात्री येथेच मुक्काम झाला. (पू. ली. २८५ ख. प्र., स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून पुणतांब्याला गेले.