मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

सावखेड (गंगा) · वैजापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 वस्ती सावखेड (गंगा)

वस्ती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
सावखेड हे गाव, श्रीरामपूर-वैजापूर मार्गावर नाऊरहून उत्तरेस ४ कि.मी. आहे व वैजापूरहून दक्षिणेस १८ कि.मी. आहे. सावखेड येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाजवळच महानुभाव आश्रम आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सावखेड गावाच्या वायव्य विभागी मराठी शाळेच्या नैऋत्येस जवळच पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: वैजापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पुरणगावहून सावखेडला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. २८५, स्था. पो. शा. खा. द. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून वांजरगावला गेले. सभामंडपातील स्थान निर्देशरहित आहे .

जवळील इतर स्थाने