मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नागमठाण · वैजापूर · छत्रपती संभाजीनगर

स्थान - T:वैजापूर D:छत्रपती संभाजीनगर

स्थान क्र. 1 तपोवन नागमठाण

तपोवन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
चांदेगावहून आग्नेयेस नागमठाण ३ फर्लांग आहे. नागमठाणला जाण्यासाठी वैजापूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नागमठाणच्या पूर्वेस अंदाजे ८०१ मीटर अंतरावर गाढीपिंपळगाव रस्त्याच्या दक्षिणेस शेतात विहिरीच्या उत्तरेस उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी या विभागास 'तपोवन' असे नाव होते.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: वैजापूर | Distt: छत्रपती संभाजीनगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात चांदेगावहून तपोवनला आले. त्यांना येथे आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. मग सर्वज्ञ येथून हमरापूरला गेले. (पू. ली. २९५, ख. प्र. स्था. पो. उ. खा. द. शा. प्र.)

जवळील इतर स्थाने