मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 1 वस्ती/अवस्थान डोमेग्राम (डोंबेग्राम)

वस्ती आणि अवस्थान स्थान (राजमठ)

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
श्रीचक्रधर मंदिरात उत्तर बाजूस पूर्वाभिमुख राजमठ आहे. सर्वज्ञांच्या वेळी हा मठ दक्षिणाभिमुख होता. मध्यभागी संगमवरी दगडाचे देऊळ आहे.

स्थान Images

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात पहिल्या वेळेस घोगरगावहून डोंबेग्रामला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते; (पूर्वार्ध लीळा २३२, स्थान पोथी) व दुसऱ्या वेळेस बाजाठाणहून डोंबेग्रामला आले, त्या वेळी त्यांचे येथे सात दिवस वास्तव्य होते. (पूर्वार्ध लीळा २९२, स्थान पोथी) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू उत्तरार्धात पहिल्या वेळेस ठिकाणी सहा महिने वास्तव्य डोंबेग्रामला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी सहा महिने वास्तव्य होते. (उत्तरार्ध लीळा १२४, स्थान पोथी) दुसऱ्या वेळेस घोगरगाव (ता. नेवासा) हून डोंबेग्रामला आले. (उत्तरार्ध लीळा २१५) त्या वेळीही त्यांचे राजमठामध्येच वास्तव्य होते. तिसऱ्या वेळेस ममदापूरहून डोंबेग्रामला आले. त्या वेळी त्यांचे येथे पंधरा दिवस वास्तव्य होते. (उत्तरार्ध लीळा २१८, स्थान पोथी उ. को. प्रत) येथील इतर लीळा : १) दाइभागवतांच्याकडून ओटा करवून घेणे. (पूर्वार्ध लीळा २३२) २) दाइभागवतांच्याकडून ओट्यासाठी चुना पिटवणे. (पूर्वार्ध लीळा २९२) ३) सर्वज्ञाचा, सकाळचा व सायंकाळचा पूजावसर या ठिकाणी होत असे. (पाठसमुदायाची पोथी पूजावसर प्रकरण) ४) भक्तजनांना परावर शास्त्राचे निरूपण करणे. (पाठसमुदायाची पोथी आणि लीळाचरित्र) ५) नाथोबांच्याकरवी भटोबासांना बाहेर घालविणे. (उत्तरार्ध लीळा १२५) ६) शरभंजन प्रसंगी देमाइसाला हिंसापाप निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १२६) ७) नेवासा गमनी भटोबासांची ज्वरनिवृत्ती करणे. (उत्तरार्ध लीळा १२८) ८) प्रार्थबाइसा व भटोबास यांना निर्वचन प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १२९) ९) भटोबासांच्याकडून दोन वेळा विलक्षण पूजा करवून घेणे. (उत्तरार्ध लीळा १२९) १०) भिक्षेचे पदार्थ लपविले म्हणून मार्तंडाला शिक्षापण करणे. (उत्तरार्ध लीळा १३१) ११) म्हाइभटांशी आक्षेपपरिहारपूर्वक चर्चा करून त्यांना ईश्वरप्रतीती करणे. (उत्तरार्ध लीळा १३३) १२) म्हाइभटांना बोध प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १३४) १३) म्हाइभटांना अनुसरणाची चर्चा निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १३६) १४) म्हाइभटांना भिक्षाविधी व अटनविधी निरूपणे (उत्तरार्ध लीळा १३७) १५) म्हाइभटांना परमेश्वराचे चतुर्विध लक्षण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १३८) १६) म्हाइभटांना महावाक्य निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १४०) १७) म्हाइभटांना संसरण प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १४१) १८) म्हाइभटांना देवता तथा क्रियास्वरूप निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १४२) १९) देशासहला कुष्ठधर्म निरूपणे (उत्तरार्ध लीळा १४४) २०) सहस्त्रार्जुना वरप्रदान व परशुरामा भेटी या दोन लीळा भक्तजनांना सांगणे. (उत्तरार्ध लीळा १४५,१४६) २१) बेडकाला बेधाने आकर्षित करणे. (उत्तरार्ध लीळा १४७) २२) साधाला गुळभेदाची हकीगत सांगणे. (उत्तरार्ध लीळा १५०) २३) लाहामाडसाची अक्षयतृतीया चरितार्थ करणे. (उत्तरार्ध लीळा १५१) २४) साधा वैस्यगृहवास अभियोगे परिहासू. (उत्तरार्ध लीळा १५२) २५) साधाला प्रसन्न होऊन वरदान देणे. (उत्तरार्ध लीळा १५४) २६) वाराणसी मुक्तिक्षेत्र-निषेध. (उत्तरार्ध लीळा १५९) २७) माहादाइसाला साभिमानीयाचे साभिमान निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १६०) २८) माहादाइसाला, वाराणसीला जाताना तीर्थक्षेत्र अमोचक व परमेश्वर सन्निधान मोचक निरूपणे व वाराणसीला जाण्याचे निराकरणे. (उत्तरार्ध लीळा १६१) २९) मासोपवासिनी प्रशोधनी मार्कडा कोपणे. (उत्तरार्ध लीळा १६८) ३०) मंडळिका दुधानयेनि जीवपरीहारूभाव कथन. (उत्तरार्ध लीळा १७०) ३१) नाथोबा हृदयसुन्यता. (उत्तरार्ध लीळा १८३) ३२) मंडळिका देवता अनुवर्जित येणे. (उत्तरार्ध लीळा १८४) ३३) वैराग्य मिरवणे हा विकाराचाच एक प्रकार आहे, याविषयी भटोबासांना निरूपण करणे. (उत्तरार्ध लीळा १९०) ३४) दाइभागवतांच्याकडून ओट्यासाठी चुना पिटविणे (उत्तरार्ध लीळा १९२) ३५) रामदेवाला शिखासूत्राचा त्याग निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १९३) ३६) बाइसी निरूपण पुसणे. (उत्तरार्ध लीळा १९६) ३७) पचन पाचन-निषेध निरूपण. (उत्तरार्ध लीळा १९६) ३८) उपासनीया रीद्धपुरी वासू निषेधू. (उत्तरार्ध लीळा १९७) ३९) नाथवाणीची प्रशंसा करणे. (उत्तरार्ध लीळा १९८) ४०) आबाइसाला गुरू लक्ष सांगणे. (उत्तरार्ध लीळा १९९) ४१) चंद्रदेवांना खीरभोजनाला पाठविणे. (उत्तरार्ध लीळा २००) ४२) चंद्रदेवांना लाडुभोजनाला पाठविणे. (उत्तरार्ध लीळा २०१) ४३) भुतानंदाला कोल्हापूरला पाठविणे. (उत्तरार्ध लीळा २०२) ४४) अन्यवार्ता निषेध निरूपण. (उत्तरार्ध लीळा २०३, पाठसमुदायाची पोथी पूजावसर प्रकरण) ४५) ज्ञान, भक्ती, वैराग्य निरूपणे. (उत्तरार्ध लीळा २०५) ४६) म्हाइभटांना संहार प्रकरण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा २०६) ४७) भटोबासांना दुसरेन अन्यव्यावृत्ती निरूपणे. (उत्तरार्ध लीळा २०९) ४८) तथा पाहाले म्हणणे. (उत्तरार्ध लीळा २१०) ४९) बाइसांचे लखुबाइशी पाए धुणे. (उत्तरार्ध लीळा २१७) ५०) आउसाला सुपारीचा दृष्टांत निरूपणे. (उत्तरार्ध लीळा २१८)

जवळील इतर स्थाने