मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 2 खांब डोमेग्राम (डोंबेग्राम)

त्राहाटीला खांब स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मुख्य ओट्यापुढे दक्षिण बाजूस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लाकडी खांब होता. तो खांब आता येथे नाही.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू प्रार्थबाइसांना निर्वचन प्रकरण निरूपण करीत होते. तेवढ्यात बाइसा उंचमठातून आल्या आणि म्हणाल्या, "हा बाबा, येथे मी नाही, नागदेव नाही, तरी हे आपण कोणाला निरूपण करीत आहेत?" तेव्हा सर्वज्ञ आवेशून म्हणाले, "आम्हाला जर इच्छा झाली, तर आम्ही एखाद्या खांबालाही निमित्त करून निरूपण करू." असे म्हणून ओट्यापुढील खांबावर थाप मारली. (उ. ली. १२९, स्था. पो.) २) एक दिवशी रात्री जेवणे झाल्यावर सर्वज्ञ निरूपण करीत होते. त्या वेळी भटोबासांना जाड्य आले होते. बाइसा कोणत्या तरी कामाला गेल्या होत्या, त्या आल्या. बाइसा म्हणाल्या, "बाबा, नागदेवाला जाड्य आले आहे, तरी हे आपण कोणाला निरूपण करीत आहेत?" तेव्हा सर्वज्ञ आवेशून म्हणाले, "आम्हाला जर इच्छा झाली, तर आम्ही एखाद्या खांबालाही निमित्त करून निरूपण करू." असे म्हणून ओट्यापुढील खांबावर थाप मारली. (पाठसमुदायाची पोथी सायंकाळचा पूजावसर)

जवळील इतर स्थाने