मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 4 उंबरवटा डोमेग्राम (डोंबेग्राम)

उंबरवटाचे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान राजमठाच्या दक्षिण दरवाजातून पुढे जाताच पश्चिम (उजव्या) बाजूस आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
राजमठाच्या दक्षिणाभिमुख दरवाजा येथे होता. भटोबास दररोज उंबरा उशाला करून झोपत असत. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पहाटेच्या वेळी उठल्यावर येथे येत. दोन दारसंका धरून एक श्रीचरण उंबऱ्यावर ठेवीत व दुसरा श्रीचरण भटोबासांच्या छातीवर ठेवीत. तेव्हा भटोबास जागे व्हायचे, श्रीचरण हृदयासी धरायचे, आलिंगन द्यायचे, कपाळावर ठेवायचे, नमस्कार करायचे, चुंबन घ्यायचे, दोन्ही नेत्रांवर ठेवायचे असे अनेक वेळा करीत. (पाठसमुदायाची पोथी, सकाळचा पूजावसर)

जवळील इतर स्थाने