मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 5 पूजावसर डोमेग्राम (डोंबेग्राम)

दुपारच्या पूजावसराचे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंबरवटाच्या स्थानापासून पश्चिमेस २ फूट ४ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञांचा दुपारचा पूजावसर येथे होत असे. (उत्तरार्ध लीळा १२४, पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर) येथील इतर लीळा : १) गदोनायकांची पत्नी म्हाळाइसा, तिच्या वस्त्रपूजेचा व उपहाराचा स्वीकार करणे. (उत्तरार्ध लीळा १४३, स्थान पोथी उ. प्रत) २) इंद्रेया पर्णानएनी भटोबासाल्या प्रसंसा. (उत्तरार्ध लीळा १४८) ३) जिळ्हाडाग श्रवणी भटोबास व मार्तड यांना क्षीरभोजन करवणे. (उत्तरार्ध लीळा १५६, स्थान पोथी उ. प्रत) ४) विद्यावंत निवारणे प्रसंगी भटोबासांना रागावणे. (उत्तरार्ध लीळा १६२) ५) मृतीकापींडग्रहणी भटोबासांना विकारज्ञान करणे. (उत्तरार्ध लीळा १९१)

जवळील इतर स्थाने