स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 14
लोपे
डोमेग्राम (डोंबेग्राम)
लोपे स्थान (१)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
ही दोन्ही उंचमठाच्या उत्तराभिमुख दरवाजाच्या पूर्व बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
भक्तजन उंचमठात राहात होते. ते उंचमठात धर्मवार्ता करतात की अन्यवार्ता करतात, हे सर्वज्ञ दरवाजाच्या चौकटीच्या आड बाजूस उभे राहून ऐकत असत. म्हणजेच स्वतःस लोपून घेऊन ऐकत असत, म्हणून या स्थानाला 'लोपे' स्थान असे म्हणतात. (पाठसमुदायाची पोथी पूजावसर प्रकरण)