स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 16
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
आसन स्थान (उंचमठ)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंचमठात दोन खांबांमध्ये आहे. स्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूचा खांब नमस्कारी आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे भक्तजनांना निरूपण करीत असत. (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर) येथील इतर लीळा : १) नाथोबा ज्वरप्रसंगी आपुलेयाचा सुश्रूषा विधी निरूपणे. (उत्तरार्ध लीळा १९५) २) ब्रह्मविद्या हे अग्नीत शास्त्र आहे, याविषयी भटोबासांना निरूपण करणे. (उत्तरार्ध लीळा २०४) ३) भटोबास व नाथोबा यांना शास्त्र विषयत्व करणे. (उत्तरार्ध लीळा २०७) ४) अशक्ताचा सुश्रूषा विधी निरूपणे. (उत्तरार्ध लीळा २१६)