स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 18
शिक्षापण
डोमेग्राम (डोंबेग्राम)
नाथोबा शिक्षापण करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तरदक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळेत, राजमठात प्रवेश करताना डाव्या बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
नाथोबांनी जेवण झाल्यावर झोळीत उल्लेखे भिक्षात्राचे तुकडे सांडपाण्याच्या नालीमध्ये टाकून दिले. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आरोगणा, पहुड, उपहुड झाल्यावर लघुपरिश्रयासाठी या बाजूला आले. नाथोबा सोबत होते. नालीमध्ये भिक्षात्र सांडलेले पाहून सर्वज्ञांनी नाथोबांना विचारले, "हे भिक्षात्र कोणी सांडले?" नाथोबा म्हणाले, "मी जेवण झाल्यावर येथे झोळी झटकली." तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, "ज्यांच्याकडून तुम्ही भिक्षा मागून आणता, ते काय तुमचे वैरी आहेत?" आपल्याला लागेल तेवढेच मागावे. आपले शीत मुंगील दोखील जाऊ देऊ नये. हे भिक्षेचे अत्र पवित्राचे पवित्र आहे. ही शीते वेचून घ्या." मग नाथोबांनी शीते वेचून खाऊन टाकली. (उ.ली. २१९, स्था. पो.) नाथोबा शिक्षापण करणे स्थानाच्या नैऋत्य बाजूस लहान देवळात जो मोठा विशेष आहे , तो सिंहनारायणाच्या देवळाचा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चरणांकित उंंबरा होय. त्या शेजारील विशेष छिन्नस्थळीचा आहे व त्यापेक्षा जो लहान विशेष आहे तो श्रीदत्तात्रेयप्रभूंचा आहे आणि त्या खालील बैठकीचा दगड हा उंच मठाच्या छताचा नमस्कारी पाषाण आहे .