स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 19
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
आसन स्थान (प्रसन्नमठ)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प्रसन्नमठाच्या पूर्व बाजूस पटीशाळेत आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे प्रसन्नमठाची उत्तरदक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळा होती.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे कधी कधी आसन होत असे. (स्थान पोथी उ. प्रत) २) दारवठ्याच्या पटीशाळेवर भिजलेली वस्त्रे बदलून कोरडी वस्त्रे परिधान केल्यावर सर्वज्ञांना येथे आसन झाले. मग पूजावसर झाला. भक्तजनांसहित आरोगणा झाली. गुळळा (चूळ भरणे )झाला. विडा झाला. (उत्तरार्ध लीळा १६३, स्थान पोथी उ. प्रत)