मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 22 विचारपूस डोमेग्राम (डोंबेग्राम)

बाळांतीणीची विचारपूस करणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान महाद्वार स्थानापासून पूर्वेस ५ फूट ९ इंच अंतरावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे उत्तरदक्षिण, पश्चिमाभिमुख पटीशाळा होती.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
१) या ठिकाणी सर्वज्ञांनी, नाथोबांच्याकडून एका निराशित बाईचे बाळांतपण करवून घेतले. त्या बाईची विचारपूस करण्याकरिता सर्वज्ञ येथे येत असत. (उत्तरार्ध लीळा १६९, स्थान पोथी) २) एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणासाठी छिन्नपापाकडे गेले होते. त्या वेळी पाऊस आला. सर्वज्ञ भक्तजनांसहित पावसामध्येच मठाकडे येण्यास निघाले. मठात येईपर्यंत सर्वज्ञांची व भक्तजनांची वस्त्रे ओली चिंब झाली. मठात आल्यावर सर्वज्ञ येथे पटीशाळेत उभे राहिले. भटोबासांनी रेइनायकांच्या घरून सर्वाच्यासाठी कपडे आणले. मग सर्वज्ञांनी ओली वस्त्रे बदलून कोरडी वस्त्रे परिधान केली. (उत्तरार्ध लीळा १६३, स्थान पोथी उ. प्रत)

जवळील इतर स्थाने