स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 23
औदास्य परिहार
डोमेग्राम (डोंबेग्राम)
औदास्य परिहार स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प्रसन्नमठात प्रवेश करताच उत्तर (उजव्या) बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) एके दिवशी सर्वज्ञांना औदास्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली. त्या वेळी ते येथे येऊन पहुडले. कोणाही भक्तजनास सर्वज्ञांच्या पुढे जाण्याचे धाडस होईना. सर्वजण चिंताप्रस्त झाले. त्या वेळी भटोबासांनी परमेश्वरपुराहून आणलेली श्रीप्रभू गोसावीयांची प्रसाद दुटी सर्वज्ञांना दाखविली व ती स्वीकारण्याची विनंती केली. श्रीप्रभू गोसावीयांची प्रसाद दुटी पाहताच सर्वज्ञांचे औदास्य परिहारले. दुटी सर्वज्ञांनी परिधान केली. या प्रसंगी सर्वज्ञांनी भटोबासांना प्रसादाची महिमा निरूपण केली. (उत्तरार्ध लीळा १५८, स्थान पोथी) २) माहादाइसा श्र्वेत उपहारी भट चमरीदंडे ताडणे. (उत्तरार्ध लीळा १५७, स्थान पोथी उ. प्रत)