मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

डोमेग्राम (डोंबेग्राम) · श्रीरामपूर · अहिल्यानगर

स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर

स्थान क्र. 27 अनुवर्जित जाणे डोमेग्राम (डोंबेग्राम)

साधा अनुवर्जित जाणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीचक्रधर मंदिराच्या किंचित वायव्येस रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: श्रीरामपूर | Distt: अहिल्यानगर
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू संध्याकाळच्या वेळेस डोंबाइच्या देवळाच्या अंगणात बसलेले होते. साधा गंगेहून जेवून आली. सर्वज्ञांना दंडवत केले. सर्वज्ञ साधाला म्हणाले, 'तुम्ही घरी जा' साधा म्हणाली, 'रस्त्याने जाताना मला अस्पष्ट आकृत्या दिसतात. त्याची मला भिती वाटते.' मग सर्वज्ञ येथपर्यंत साधाला पोचवीत आले. येथे उभे राहिले. साधा जाताना मागे पहायची, तेव्हा सर्वज्ञ येथेच उभे असलेले दिसायचे. गुंफेच्या दरवाजात प्रवेश केल्यावर मग सर्वज्ञ दिसेनासे झाले. (उत्तरार्ध लीळा १८६)

जवळील इतर स्थाने