स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 30
निरूपण
डोमेग्राम (डोंबेग्राम)
नाथोबा निरूपण करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रेइनायकांच्या आवारात दरवाजातून आत जाताच डाव्या हाताला आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एक दिवशी रेइनायकांच्या आवारी दुपारचा पूजावसर झाला. भोजनासाठी सर्वांना ताटे वाढली. सर्वज्ञ आरोगणा करू लागले. सर्व भक्तजन जेवू लागले. नाथोबा मात्र रुचीपूर्वक जेवत असल्याचे सर्वज्ञांनी पाहिले. जेवण झाल्यावर सर्वज्ञांनी नाथोबांना विचारले, "जेवताना आमचा आठव करीत होता?" नाथोबा म्हणाले, "नाही जी." सर्वज्ञ म्हणाले, "तुम्ही झोपण्याच्या वेळी, बसण्याच्या वेळी व भोजनाच्या वेळी परमेश्वराचा आठव केला पाहिजे." असे निरूपण करून सर्वज्ञ मठाकडे गेले. (उ. ली. १८२, स्था. पो.)