स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 32
आरोगणा
डोमेग्राम (डोंबेग्राम)
आरोगणा स्थान (रेइनायक आवार)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान मादने स्थानापासून दक्षिणेस ३ फूट ७ इंच अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एके दिवशी रेइनायकांच्या आवारी पूजावसर झाला. सर्वज्ञांच्यासाठी ताट केले. भक्तजनांनाही वाढले. सर्वज्ञ जेवू लागले. नाथोबा मात्र हात धरून बसले होते. सर्वज्ञ नाथोबांना म्हणाले, "तुम्ही का जेवत नाही?" नाथोबा म्हणाले, "तूप वाढायचे राहिले आहे." तेव्हा "आणा आणा तूप" म्हणून रेइनायक मोठ्याने ओरडले, तूप आणले, नाथोबांना वाढले. मग सर्वज्ञ नाथोबांना म्हणाले, "तुम्ही महात्मे आहात. तुम्ही ताटात जे वाढले तेच भोजन केले पाहिजे." (उ. ली. १८१, स्था. पो.)