स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 33
विसावा
डोमेग्राम (डोंबेग्राम)
विसाव्याचे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान गोदावरी नदीच्या पात्रात दक्षिण बाजूस षटकोनी मंदिरात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रात्रीचा पूजावसर, आरोगणा झाल्यावर राजमठाहून भटोबासांच्या पाठीवर आरोहण होऊन छिन्नपापाकडे जाताना येथे उतरले. क्षणभर विसावा घेतला. मग भटोबासांचा खांदा थापटला, व पुन्हा पाठीवर आरोहण होऊन छिन्नपापाकडे गेले. (उ.ली. १६६, स्था.पो.)