स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 34
जळघोष निवारण
डोमेग्राम (डोंबेग्राम)
जळघोष निवारण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान विसाव्याच्या स्थानापासून पश्चिमेस अंदाजे १०० मीटर अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एक दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सकाळचा पूजावसर झाल्यावर विहरणासाठी येथे आले. सर्वज्ञ भक्तजनांना निरूपण करीत होते, परंतु जवळून वाहणाऱ्या पाण्याच्या खळखळ आवाजामुळे निरूपण नीट ऐकू येत नव्हते. भक्तजन म्हणाले, "जी जी या पाण्याच्या खळखळ आवाजामुळे निरूपण नीट ऐकू येत नाही." सर्वज्ञ आऊसाला म्हणाले, "नायका, हा फुटा आड घाला." आऊसाने फुटा आड घातला आणि पाण्याचा येणारा खळखळ आवाज बंद झाला. निरूपण संपल्यावर सर्वज्ञांनी आऊसास तो फुटा काढण्यास सांगितले. आऊसाने फुटा काढताच पुन्हा पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. भक्तजन म्हणाले, "हे कसे काय! इतका वेळ आवाज येत नव्हता! आता कसा आवाज येत आहे?" सर्वज्ञ म्हणाले, "हे आऊसाचे सामर्थ्य." आऊसा म्हणाली, "माझे कशाचे सामर्थ्य, हे स्वामी जगन्नाथाचे सामर्थ्य." मग सर्वज्ञ गुंफेकडे गेले.