स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 35
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
पिंडापाशील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जळघोष निवारण स्थानाच्या दक्षिणेस दक्षिणाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दुपारचा पूजावसर झाल्यावर येथे येत असत व भक्तजनांना निरूपण करीत असत. (स्थान पोथी उ. प्रत) २) डोंबेग्रामी अवस्थान असताना सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. (पाठसमुदायाची पोथी, दुपारचा पूजावसर) ३) रामचंद्रांनी दशरथाचे पिंड पाठलेली जागा सर्वज्ञांनी भक्तजनांना दाखविली व त्या पिंडास श्रीकराच्या बोटाने स्पर्श केला. (स्थान पोथी उ. प्रत)