स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 36
आसन
डोमेग्राम (डोंबेग्राम)
ढगावरील आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पिंडापाशील आसन स्थान देवळाच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे डोंबेग्राम येथे वास्तव्य असताना ते कधी कधी येथे विहरणासाठी येत असत. त्या वेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. ते भक्तजनांना ब्रह्मविद्याशास्त्राचे निरूपण करीत असत. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचा येथे उत्तराभिमुख आसन होते. त्या वेळी म्हाइंभट सराळ्याहून आले. आधल्या दिवशी सर्वज्ञांनी त्यांना महावाक्य निरूपण केले होते. त्यातून त्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न त्यांनी येथे सर्वज्ञांना विचारले, त्याप्रसंगी सर्वज्ञांनी म्हाइंभटांना त्र्यंश निर्वच, काही निर्वचन आणि महावाक्याची अर्थवचने निरूपण केली. (उ.ली. १४०, स्था.पो.)