स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 41
पडिताळणे
डोमेग्राम (डोंबेग्राम)
गोविंदाशी पडिताळणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान सोंडीवरील आसन स्थान देवळाच्या पूर्वेस अंदाजे १०० मीटर अंतरावर ओळाच्या उत्तर बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एक दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भक्तजनांसहित रामनाथाकडे विहरणासाठी आले. रामनाथाच्या सोंडीवर सर्वज्ञांना आसन झाले. सर्वज्ञ म्हणाले, "या लखुमीयाबरोबर कोण धावू शकेल?" तेव्हा सत्यादेवीचा गोंदो म्हणाला, "मी धावू शकेल." सर्वज्ञ म्हणाले, "तू धावू शकणार नाहीस." गोंदो म्हणाला, "मी धावू शकेल." मग दोघांच्यामध्ये सिंहनारायणाचा कोपरा शिवून परत रामनाथाकडे येण्याची शर्यत लागली. दोघे धावत निघाले. सिंहनारायणाचा कोपरा शिवून दोघे परत येत होते. परत येताना गोंदोच्या पायाला जोरात खडा लागला. त्यामुळे तो पडला. "गोंदो पडला" म्हणून भक्तजन मोठ्याने ओरडले. तेव्हा सर्वज्ञ धावत येथे आले. भक्तजनांनी वर चांदोवा धरला होता. गोंदोला उठविले. गोंदोला जेथे लागले होते, तेथे पीक घातली, ते सावध झाले. सर्वज्ञ गोंदोला म्हणाले, 'तुम्हाला म्हटले होते की, लखुमीयाबरोबर धावू शकणार नाही. आम्ही जे नको म्हटले ते करू नये.' मग सर्वज्ञांनी सारंगपंडितांच्याकडे पाहिले. तेव्हा सारंगपंडित म्हणाले, 'द्वापर युगामध्ये भीष्मपितामह शरपंजरी पडल्यावर श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवांच्यासहित त्यांची विचारपूस करण्यासाठी गेले होते. पालव छत्ते वर गंगावने, चवरे ढाळती तो जसा प्रसंग, तसाच हाही प्रसंग वाटत आहे.' सर्वज्ञ म्हणाले, 'काडगा पांडेया : पांडीत्य कीजताए।।' सारंगपंडित म्हणाले, 'नाही जी हा यथार्थ आहे.' मग सर्वज्ञ गुंफेकडे गेले. (उ. ली. १०३, स्था. पो.)