स्थान - T:पारनेर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 1
वस्ती स्थान
लोणी (हवेली)
वस्ती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
लोणी (हवेली) हे गाव, अहिल्यानगर-पारनेर (जामगाव मार्ग) मार्गावर अहिल्यानगरहून नैऋत्येस ३३ कि.मी. आहे व पारनेरहून पूर्वेस ५ कि.मी. आहे. लोणीला जाण्यासाठी अहिल्यानगर व पारनेर येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. लोणी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच मंदिराच्या समोरील बाजूस पं. विश्वनाथव्यास बाळापूरकर या नावाने ओळखला जाणारा महानुभाव मठही आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
लोणी गावाच्या वायव्य विभागी एस.टी. बस थांब्याजवळ सिद्धनाथाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे सभामंडपात आहे. चौक नमस्कारी आहे. आज हे देऊळ, गोपालकृष्ण मंदिर या नावाने ओळखले जाते.
स्थान Images
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्थ काळात सायंकाळच्या वेळेस पारनेरहून लोणीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून जामगावला गेले. (उ.ली. २८८, स्था. पो.)