स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
अवस्थान स्थान (छिन्नपाप गुंफा)
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दूरदरकूटे बुजविणे स्थान देवळापासून आग्नेयेस सुमारे अंदाजे १०० मीटर अंतरावर भव्य उंच जागेवर उत्तराभिमुख देवळात मध्यभागी जो मोठा ओटा आहे, ते अवस्थान स्थान होय. या ओट्यात अवस्थान स्थानासहित एकूण ९ स्थाने आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे पूर्वाभिमुख गुंफा होती.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.