स्थान - T:श्रीरामपूर D:अहिल्यानगर
स्थान क्र. 55
उदरव्यथा निवारण
डोमेग्राम (डोंबेग्राम)
भटोबासांची उदरव्यथा निवारण करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस ९ कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर ११ कि.मी. नेवासा ते भोकर २१ कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस ७ कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम ७ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नवी गार करविणे स्थानापासून उत्तरेस ९० फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एक दिवशी भक्तजन मातीकाम करीत होते. तेव्हा भटोबासांचे पोट दुखू लागले. ते लिंबाच्या झाडाखाली जाऊन झोपले. त्यामुळे मातीकाम थांबले. सर्वज्ञ गुंफेबाहेर आले. त्यांनी विचारले, 'मातीकाम का थांबले?' भक्तजन म्हणाले, 'नागदेवाचे पोट दुखत आहे.' मग सर्वज्ञ येथे आले व भटोबासांना म्हणाले, 'मातीकाम का थांबले?' भटोबास म्हणाले, 'माझे पोट दुखत आहे.' सर्वज्ञ म्हणाले, 'तू काम नाही केलेस तर हे इतर कुणीच करणार नाहीत.' भटोबास म्हणाले, 'माझे पोट दुखण्याचे थांबवा, मग मी काम करेन. सर्वज्ञ म्हणाले, 'आम्ही तुझे पोट दुखविण्याचे थांबवितो; पण तू किती दगड वाहशील?' भटोबास थोडे म्हणत. सर्वज्ञ अधिक म्हणत. शेवटी २२ दगड वाहण्याचे ठरले. मग भटोबासांनी दगड वाहण्यास सुरुवात केली. दगड वाहता वाहता पोट दुखण्याचे थांबले. (उ. ली. ८९, स्था. पो.)